Weather Update: सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे व त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर बघायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे व पावसासाठी पोषक हवामान बघायला मिळत आहे. ठीक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे
सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी होताना बघायला मिळत आहे परंतु ओडीसा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये समुद्रसपाटीवरून साडेसात किलोमीटर उंचीवरून हवेचे चक्राकार वारे वाहत आहेत. कमी दाबाच्या पट्ट्याचा आज दक्षिणेकडे सरकण्याचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानुसार आता कमी दाबाचा पट्टा काहीच दक्षिणेकडे असून राजस्थान पासून बंगालच्या पूर्व मध्य भागापर्यंत कमी दाब क्षेत्र प्रभावशाली होताना बघायला मिळत आहे.
Weather Update: या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.
कोकण विभागामधील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्र मधील धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर तर विदर्भाच्या काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो इतर ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रातील पुणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, जालना या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त अहमदनगर, नाशिक, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा