तुम्हाला माहित आहे का तुम्हाला दरवर्षी भारत सरकार मार्फत पाच लाख रुपयांचा स्वास्थ विमा मिळू शकतो परंतु यासाठी तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या या लेखात आपण आयुष्मान कार्ड कसे काढावे याविषयी माहिती जाणून घेऊया.
परिवार आणि स्वास्थ्य कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत भारतातील नागरिकांना पाच लाख रुपयांचा विमा दिला जातो परंतु यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असणे गरजेचे असते जर तुम्ही आयुष्यमान कार्ड बनवलेले नसेल तर आयुष्मान कार्ड कसे बनवायचे हे जाणून घेऊया.
आयुष्मान कार्ड कसे काढावे
आयुष्मान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट https://setu.pmjay.gov.in/setu/stateSchemeSearch वर जावे लागेल व तेथील सर्व सूचनांचे पालन केल्यास तुम्ही आयुष्मान कार्ड काढू शकाल. आयुष्यमान कार्ड काढणे विषयीची अधिक माहिती आम्ही खाली दिलेली आहे
योजनेचे नाव | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना |
विभाग | गृह आणि स्वास्थ विभाग भारत सरकार |
लाभ | पाच लाख रुपयांपर्यंतचा स्वास्थ्य विमा |
लाभार्थी | भारतातील नागरिक |
आवेदनाची पद्धत | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
निवड प्रक्रिया | SECC 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | pmjay.gov.in |
आयुष्मान कार्ड कसे बनवायचे
- सर्वात प्रथम प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा : https://setu.pmjay.gov.in/setu/stateSchemeSearch
- संबंधित संकेतस्थळावर तुम्हाला रजिस्टर तसेच साईन इन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
- आता तुमच्यापुढे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल यावरती मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक नमूद करून सबमिट बटन वर क्लिक करा
- आता परत लॉगिन बटन वर क्लिक करा व त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका ज्या वरती तुमचा ओटीपी येईल
- मोबाईलवर पडलेला ओटीपी इंटर करा आणि Apply Ayushman Cad Through State Scheme च्या ऑप्शन वरती क्लिक करा
- तुमच्यापुढे एक फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा तसेच तालुका निवडावा लागेल
- तुमच्या राशन कार्ड वरील व्यक्तींची नावे तुम्हाला दिसतील त्याच्यापुढे तुम्हाला view नावाचा ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे
- यानंतर परत एक फॉर्म ओपन होईल त्यावरती तुम्हाला उपयुक्त माहिती योग्य पद्धतीने भरायचे आहे व सबमिट बटन क्लिक करायचे आहे
- सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर फॉर्म ची रिसिप्ट डाऊनलोड करा
- प्राप्त झालेल्या रजिस्ट्रेशन नंबर बरोबर आधार कार्ड आणि रेशन कार्ड बरोबर घेऊन जवळच्या स्वास्थ सेवा केंद्र मध्ये जा आणि आयुष्यमान कार्डाचे सत्यापन करा त्यानंतर तुमचे आयुष्यमान कार्ड तयार होईल.
वरती नमूद केलेल्या स्टेप चा अवलंब करून तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने आयुष्यमान कार्ड बनवू शकाल.
सारांश
आजच्या या लेखांमध्ये आपण आयुष्मान कार्ड कसे काढावे याविषयी माहिती जाणून घेतली तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख नक्की शेअर करा व या लेखात जर काही त्रुटी आढळली असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा.
हे पण वाचा
- पपई खाण्याचे फायदे आणि तोटे ~ वैद्यकीय माहिती सोप्या भाषेत
- आरक्षण म्हणजे काय | What is Reservation in Marathi
- लाक्षणिक उपोषण म्हणजे काय
- काम सोडण्याचा अर्ज, सोप्या आणि प्रोफेशनल भाषेमध्ये राजीनामा पत्र
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा