आर्थिक पर्यावरण म्हणजे काय ? What is economic environment

आर्थिक पर्यावरण म्हणजे काय: एखाद्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या आर्थिक परिस्थितीवरती परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांना आर्थिक पर्यावरण असे म्हटले जाते. आर्थिक पर्यावरणामध्ये आर्थिक धोरणे, राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक मूल्य, सामाजिक मूल्य, कायदेशीर प्रणाली, तंत्रज्ञान तसेच नैसर्गिक संसाधनांचा समावेश होतो. देशाच्या तसेच संबंधित प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक पर्यावरण खूप महत्त्वाचे असते.

आर्थिक पर्यावरणावर विविध घटक कार्य करत असतात ज्यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो:

  • राजकीय परिस्थिती
  • आर्थिक धोरणे
  • सामाजिक आणि राजकीय मूल्य
  • कायदेशीर प्रणाली
  • तंत्रज्ञान
  • नैसर्गिक संसाधने
  • जागतिकीकरण
  • पर्यावरणीय घटक

राजकीय परिस्थितीचा आर्थिक पर्यावरणावर परिणाम

आर्थिक पर्यावरणावर राजकीय परिस्थिती एक महत्त्वपूर्ण प्रभाव टाकत असते. सुव्यवस्थित राजकीय परिस्थितीमुळे आर्थिक पर्यावरणाला पाठबळ मिळते तर अनिश्चित राजकीय परिस्थिती ही आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण करत असते.

स्थिर राजकीय परिस्थितीमुळे व्यवसायाला चालना मिळते आणि आर्थिक विकासाला चालना मिळत असते तर राजकीय अस्थिरतेमुळे दहशतवाद, हिंसा आणि अशांतता निर्माण होऊन आर्थिक परिस्थितीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो व जैविक तसेच मालमत्तेचे हानी होण्याची शक्यता असते.

आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे आर्थिक धोरणे

व्यापार धोरणे, कर धोरणे तसेच वित्तीय धोरणांचा आर्थिक परिणाम होत असतो व संबंधित घटक हे आर्थिक पर्यावरणावरती दीर्घकालीन परिणाम करत असतात.

गुंतवणूक आणि उत्पादनावरती कर धोरणांचा परिणाम होतो, कमी कर दरामुळे उत्पादनात आणि गुंतवणुकीमध्ये वाट बघायला मिळालेले आहे. व्यापार धोरणामुळे मुक्त व्यापार धोरण आर्थिक विकासाला चालना देतात तसेच वित्तीय धोरणांमध्ये व्याजदर व चलनवाढीचा आर्थिक पर्यावरणावर मोठा परिणाम होतो.

सामाजिक तसेच सांस्कृतिक मूल्य

आर्थिक पर्यावरणावर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा देखील प्रभाव पडतो उदाहरणार्थ बचतीची सवय ही समाजात आर्थिक पर्यावरणामध्ये सकारात्मक बदल घडून आणत असते.

बचत आणि गुंतवणूक मुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. बचतीच्या पैशांचा उपयोग हा गुंतवणुकीसाठी केला जातो आणि आर्थिक विकास होतो तसेच सांस्कृतिक मूल्यांमध्ये आणि सामाजिक मूल्यांमध्ये समानता आणि न्यायाचा प्रभाव देखील आर्थिक विकासावरती पडत असतो. ज्या मूल्यांमध्ये शांतता आणि स्थिरता असते अशा ठिकाणी गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चांगली चालना मिळत असते.

कायदेशीर प्रणाली

मालमत्तेचे अधिकार, कर्जाचे वितरण तसेच व्यापार आणि गुंतवणुकी वरती कायदेशीर प्रणालीचा मोठा परिणाम होत असतो जर चुकीची कायदेशीर प्रणाली असेल तर त्याचा आर्थिक पर्यावरणावरती वाईट परिणाम होऊन अर्थव्यवस्था कोलमडू शकते.

कर्ज आणि मालमत्तेचे अधिकार तसेच कर्जांचे नियमित नियमान हे कायदेशीर प्रणाली द्वारे शक्य होते. अनियमित होणारे आर्थिक व्यवहार हे कायदेशीर प्रणालीमुळे थांबले जातात व त्यामुळे एक सुदृढ आर्थिक पर्यावरण निर्माण होण्यास शक्यता निर्माण होते.

सारांश

मला आशा आहे आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला आर्थिक पर्यावरण म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती मिळालेली असेल तर तुम्हाला हा लेख आवडलेला असेल तर तुम्ही हा लेख आत्ताच शेअर करा व जर या लेखांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळलेली असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट च्या माध्यमातून कळवू शकतात.

हे पण वाचा :

  1. आरक्षण म्हणजे काय
  2. लाक्षणिक उपोषण म्हणजे काय
  3. साखळी उपोषण म्हणजे काय
  4. समुद्रातील आगीला काय म्हणतात

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा