सध्या महाराष्ट्रात ठीक ठिकाणी लोक लाक्षणिक उपोषण करत आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये हा प्रश्न पडू शकतो की लाक्षणिक उपोषण म्हणजे काय व लाक्षणिक उपोषण केल्याचे फायदे तसेच तोटे काय असू शकतात. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण लाक्षणिक उपोषण म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया तसेच लाक्षणिक उपोषणाची काही उदाहरणे देखील जाणून घेऊया.
लाक्षणिक उपोषण म्हणजे काय
जेव्हा एखादा व्यक्ती अन्न न खाता एखाद्या गोष्टीच्या विरोधात आपले मत प्रकट करण्यासाठी उपोषण करत असतो तेव्हा त्याला आपण लाक्षणिक उपोषण असे म्हणू शकतो. लोकांना त्यांच्या हक्कासाठी तसेच सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी लाक्षणिक उपोषण हे एक महत्त्वपूर्ण मार्ग ठरत आहे त्यामुळे देशात ठीक ठिकाणी विविध कारणांसाठी लाक्षणिक उपोषण केले जाते.
लाक्षणिक उपोषण करत असताना उपोषण करणाऱ्या व्यक्ती अन्न घेत नाही त्यामुळे त्याचा परिणाम संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावरती होतो व त्यामुळे संबंधित उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या शरीर कार्याला बाधा निर्माण होऊन वेगवेगळे अपाय होण्याची शक्यता असते
लाक्षणिक उपोषण करत असताना काही व्यक्ती अण्णा न खाता काही दिवस तसेच काही आठवडे घालवतात तर काही व्यक्ती अन्ना सोबतच विशिष्ट पदार्थ किंवा पेयजल घेण्यास देखील नकार देतात यामुळे मानवी शरीरात ऊर्जेची कमतरता होऊन मानवी शरीरामध्ये कमजोरी येते.
लाक्षणिक उपोषण – फायदे आणि तोटे
लक्षणीय उपोषणाचे काही फायदे देखील आहे. लाक्षणिक उपोषणाच्या मदतीने लोकांना समाजातील अनिष्ट चालीरीतींच्या विरोधात आवाज उठवता येतो व त्यामुळे सामाजिक व्यक्ती समाजातील घटकांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यास प्रेरित करत असतात, त्यामुळे सामाजिक बदल घडवून येण्याची शक्यता असते. तसेच लाक्षणिक उपोषणामध्ये कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराशिवाय आपल्या मागण्या मान्य करून घेता येऊ शकतात व सरकार वरती चुकीच्या धोरणांविरोधात दबाव आणला जाऊ शकतो.
लाक्षणिक उपोषण हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते व वेळीच उपचार झाले नाही तर जीवावर देखील बेतू शकते. कधीकधी लाक्षणिक उपोषण करत असताना समाजातून नकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकते. चुकीच्या गोष्टींसाठी लाक्षणिक उपोषण केल्यास समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण होऊ शकते.
लक्षणीय उपोषण करत असताना गंभीर निर्णय घेणे गरजेचे ठरते जर एखाद्या व्यक्तीला लाक्षणिक उपोषण करायचे असेल तर त्यापूर्वी संबंधित व्यक्तीने संभाव्य फायद्यांचा आणि संभाव्य धोक्याचा विचार करणे महत्त्वपूर्ण ठरते कारण लाक्षणिक उपोषणामध्ये अधिक काळ घालवल्यास मानवी शरीरास वाईट परिणाम होत असतात.
लाक्षणिक उपोषणाचे उदाहरणे
ब्रिटिश राजवटीच्या विरोधात महात्मा गांधी यांनी वेळोवेळी लाक्षणिक उपोषण करून ब्रिटिश धोरणांविरोधात आपले मत प्रकट केले होते.
अमेरिकेचे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचे लाक्षणिक उपोषण देखील एक चांगले उदाहरण आहे ज्यामध्ये त्यांनी असमानता आणि वंशभेदाच्या विरोधात अमेरिकेमध्ये लाक्षणिक उपोषण केले होते.
आजच्या काळामध्ये देखील ठिकठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने तसेच इंधन टंचाईच्या विरोधामध्ये लाक्षणिक उपोषण केले जातात त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ विरोधात देखील लक्षात केल्याची उदाहरणे मिळतात.
हे पण वाचा:
सारांश:
मानवी हक्कांसाठी लढण्याचे लाक्षणिक उपोषण हे महत्त्वपूर्ण साधन आहे परंतु लाक्षणिक उपोषण करण्याआधी संबंधित व्यक्तीने मनाची तयारी ठेवणे गरजेचे ठरते. समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी व समाजातील लोकांना त्यांच्या हक्कासाठी प्रेरित करण्यासाठी लाक्षणिक उपोषण महत्त्वपूर्ण ठरते. आजच्या या लेखात आपण लाक्षणिक उपोषण म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेतले. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट च्या माध्यमातून कळवा व लेख आवडला असल्यास पुढे शेअर करा.
हे पण वाचा:
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा