Havaman andaj: सध्या बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना बघायला मिळत आहे व हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिम आणि पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत आहे त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होऊन महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे व बऱ्याच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडताना बघायला मिळत आहे हा पाऊस पिकांना नव संजीवनी देणारा ठरत असला तरी अजूनही महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाची कमतरता बघायला मिळते म्हणूनच हवामान विभागाचा अंदाज महत्त्वाचा ठरतो.
24 तासांचा हवामान अंदाज | IMD update Maharashtra
हवामान विभागानुसार आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सर्व दूर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत तसेच पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेले आहे. आज कोकण किनारपट्टीवर देखील पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेले आहे.
पुणे, सातारा आणि नाशिकच्या घाटमाथाच्या परिसरावर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच कोकण किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली या भागांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
पुढील काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे विदर्भ कडून मराठवाडा कडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा