Havaman Live : आज 19 जुलै, आज महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळतो. काही भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस राहण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर खूप मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने देखील दिलेला आहे. छोटीशी अपडेट आहे त्यामुळे ही अपडेट पूर्ण वाचा.
मित्रांनो अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबामुळे उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढताना बघायला मिळत आहे. आज उत्तर कोकणामध्ये पालघर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस सकाळपासूनच बघायला मिळू शकतो. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरन राहील. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल.
विदर्भ मराठवाडा हवामान अंदाज
तर विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाचे पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये गडचिरोली चा एकदम दक्षिणी भाग, आदिलाबाद, अहेरी, भामरगर या भागांमध्ये एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदस्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस सकाळपासूनच आहे. रात्री मध्यरात्री देखील या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे.
अमरावती विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळपासून पाऊस राहील त्यामध्ये अकोला, अकोट, कारंजा, यवतमाळ, वाशीम मध्ये सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता आहे. अमरावतीच्या आसपासच्या भागांमध्ये मुख्यातेकरून करून जो काही पश्चिम पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाची जास्त राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.
Havaman Live आजचा हवामान अंदाज
जळगाव, यावल, सावडा, मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुजरात मध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
परतुर, देऊळगाव राजाचा काही परिसर आहे तसेच इकडं सेवाली, बिबी, लोणार या परिसरामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील एकदम कडेचे पूर्व भागातील जिल्हे नांदेड आणि हिंगोली च्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. इकडे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव मध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे विभागांमध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. इकडे कोकणालगतच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर पूर्वी भागांमधील जिल्हा मध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो.
महाराष्ट्र हवामान अंदाज
आज १९ तारीख आहे रात्रीपर्यंत आपण बघू शकता उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस धुळे, जळगाव, पाचोरा, शिरपूर या भागामध्ये होण्याची शक्यता आहे. जालना जिल्हा खूप जोरदार पाऊस शक्यता आहे. परभणी आसपास चा परिसर तसेच इकडे नांदेड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आज पावसात जोर जास्त राहील. त्यामध्ये वासिम, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, तसेच इकडे बीडचा काही भाग, लातूर, धाराशिव, नांदेड या भागांमध्ये काही काही ठिकाणी भाग बदलत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पाऊस होऊ शकतो तर आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता बहुतांश भागांमध्ये आहे.
उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील सर्वच भागांमध्ये आज चांगल्या स्वरूपाचे वातावरन निर्माण होऊन चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही काही ठिकाणी खूप भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला विदर्भात त्यानंतर मराठवाड्यात देखील काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे.
रोजचे हवामान अंदाजाचे अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्याकरता येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा