Havaman andaj: महाराष्ट्र मध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय ; या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Havaman andaj : आज दुपारी आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गुजरात पासून ते महाराष्ट्राच्या उत्तरी भागापर्यंत व विदर्भ पासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागपूर विभाग हवामान अंदाज

नागपुर विभागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल. त्यामध्ये मुख्यते करून चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आदिलाबाद, चंद्रपूर शहराचा भाग, त्याचबरोबर चंद्रपूरचा दक्षिण भाग, राजुरा, भद्रावती या भागांमध्ये देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल. वर्धा मध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, उमरेड, कोंडाली या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त भंडारामध्ये मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार धुळे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. जळगावच्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हलका मध्यम पाऊस बहुतांश भागांमध्ये बदल होईल. तसेच बुऱ्हाणपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे

अमरावती विभाग आणि कोकण विभाग havaman andaj

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच आसपासचा परिसर कारंजा या भागामध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील असू शकतो. अमरावती जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.

कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर जास्त राहणार आहे. दक्षिण कोकणामध्ये सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरी भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. हे क्षेत्र गुजरात पासून ते बंगालच्या उपसागर पर्यंत निर्माण झालेले आहे त्यामुळे या परिसरात आज चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हवामान अंदाज

मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. नाशिक विभागांमध्ये पश्चिम पट्ट्यांमध्ये अधून मधून हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील. नाशिकच्या पूर्वी भागांमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो.

पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर च्या जिल्ह्यांमध्ये कोकणालगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील. तर पूर्वी भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सोलापूर मध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा