Havaman andaj: ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमीदाब क्षेत्राची निर्मिती झाली असून त्याला लागून समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या मध्यभागातून असलेले पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोडक्षेत्र समुद्रसपाटीपासून 3.1 ते 7.7 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहेत. या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
Havaman andaj | विदर्भ आणि मराठवाडा हवामान अंदाज
नागपूर विभाग मध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या क्षेत्रामध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसेच कापसी, कांकेर या परिसरामध्ये सकाळपासूनच चांगल्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील.
अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम यवतमाळ या क्षेत्रामध्ये वाशिम मध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे. यवतमाळ मध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची हजेरी लागू शकते.
आज मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये दुपारनंतर श्री छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड तसेच जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये भाग बदलत जोरदार ते अति जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. मध्यम पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर लातूर आणि नांदेडच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उदगीर, देगलूर, अहमदपूर, पार्ली, लातूरचा काही परिसर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो.
पश्चिम महाराष्ट्र हवामान अंदाज
मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये आज पूर्वी भागांमध्ये पावसाचे हळूहळू वाढताना बघायला मिळेल. आज नगर मध्ये हलक्या मध्यम, पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर रात्रीपर्यंत काही भागांमध्ये मध्यम पाऊस बघायला मिळेल. नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग, या परिसरामध्ये आजही पावसात जोर काहीसा कमी राहील. हलक्या पावसाची शक्यता आहे
नाशिक मध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिकच्या पूर्वी भागांमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो.
धुळे, जळगाव आणि पाचोरा च्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे नवापूर, साक्री वगैरे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मधला जो पट्टा आहे साक्री तसेच मालेगाव चा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी असली तरी पण या ठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळू शकते.
पुणे आणि कोकण विभाग हवामान अंदाज
पुणे विभागाच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच पुणे विभागाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. लग्नाच्या भागांमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी आज जोरदार पाऊस होऊ शकतो. आज दक्षिण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तर उत्तर कोकणामध्ये थोडासा पाऊस जरी कमी होताना बघायला मिळत असला तरी घाटमाथ्याच्या क्षेत्रावर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.