Monsoon Prediction: बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढत आहे व त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो.
Monsoon Prediction: नागपूर विभाग
आज नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळपर्यंत या क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या एकदम कडेच्या असिफाबाद आणि आसपासच्या परिसरामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे
अमरावती विभाग मधील अमरावती तसेच कारंजा, यवतमाळ या क्षेत्रात सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे. यवतमाळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आज मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या आसपासच्या परिसरामध्ये दिग्रस, दारव्हा, नेर, रुई तसेच पुलगावच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. अमरावती जिल्ह्यामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच मोजारी, आर्वी, आष्टी च्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल.
महाराष्ट्र मधील आजचे हवामान अंदाज
वर्धा च्या काही भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये देवळी, पुलगाव, आणि वर्धाच्या काही परिसरामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. कोकण विभागांमध्ये देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे कोकण विभागातील जवळपास सर्वच भागांमध्ये आज चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिक आणि मराठवाडा हवामान अंदाज
नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल व नाशिकच्या पूर्वी भागांमध्ये आज देखील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये आज वीखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील, हलक्या मध्यम पावसाची शक्यता. पुणे विभागाच्या कोकणालगतच्या भागांमध्ये आज देखील पावसाचा जोर बघायला मिळेल तसेच पूर्वी भागांमध्ये आज पावसाचा जोर काहीसा कमी राहील.
दररोज चा हवामान अंदाज व्हॉट्सॲप वर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा