Monsoon update: आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणूनच आजच्या या लेखात आपण आज कुठे कुठे पाऊस पडणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊया छोटीशी अपडेट आहे त्यामुळे ही अपडेट पूर्ण वाचा.
महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे परंतु बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत आहेत व त्यामुळे पेरणीची व शेतीची कामे खोळंबली आहेत. राज्यातील अनेक भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात हवामान हे संमिश्र स्वरूपाचे राहील असा हा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जणेसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे
मुंबई पुणेसह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज मुसळधार पाऊस होणार नाही असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये पावसाचा जोर ओसरेल.
महाराष्ट्र राज्यामध्ये 13 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेले आहे व कोकणपट्ट्यामध्ये सध्या चांगला पाऊस पडत आहे.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा