IMD Update: उद्यापासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस? काय आहे हवामान विभागाचा अंदाज

IMD Update: महाराष्ट्र राज्यात हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे तर काही भागांमध्ये उष्णतेचा तडाका वाढलेला आहे. अशातच हवामान विभागाने सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार 23 जून पासून राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही प्रदेश आणि विदर्भ मध्ये पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तसेच 24 आणि 25 जून पासून महाराष्ट्र राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागांनी सांगितलेला आहे. त्याचबरोबर मराठवाडा मधील देखील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्रातील पावसाने दडी मारलेली आहे त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे व शेतकऱ्यांची शेती अडचणीत आलेली आहे. शेतकऱ्यांपुढे खरीप हंगाम जाण्याची भीती उभी राहिलेली आहे. परंतु, उद्यापासून महाराष्ट्रात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.

पुढील चार दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मेगगर्जनेसह होऊ शकतो अशी शक्यता सांगण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. उद्या 22 जूनला मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा तर 23 आणि 24 जून रोजी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असे प्रतिपादन भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे

पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. जवळपास सर्वच भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. 23 आणि 24 जूनला विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर 24 जूनला कोकणात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये मात्र हलक्या सरींची शक्यता आहे.

पुण्यात देखील दोन ते तीन दिवसांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये 3 दिवसांत पाऊस होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नका असा सल्ला हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलेला आहे.

दररोज चे हवामान अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा