Flower cultivation: ही फुल शेती बदलू शकते नशीब, चांगले श्रीमंत करणाऱ्या या फुल शेती विषयी जाणून घ्या व नफा कमवा!

Flower cultivation: भारतीय संस्कृतीमध्ये फुलांचे वेगळे महत्त्व आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी फुलांचा उपयोग केला जातो त्यामध्ये कोणाला अभिनंदन करायचे असेल तर फुलगुच्छ देऊन अभिनंदन केले जाते तर देवळामध्ये देखील देवाची पूजा करायला फुलांचा उपयोग होतो विविध सण उत्सवांमध्ये फुलांची मागणी वाढलेली बघायला मिळते.

आपल्या जीवनामध्ये कधीकधी ताणतणाव वाढलेला बघायला मिळतो व हा ताणतणाव कमी करण्यासाठी फुले आपल्याला मदत करत असतात. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण नर्गिस फुल शेती विषयी माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून आपण फुल शेती द्वारे उत्पादनाचा एक चांगला मार्ग प्राप्त करू शकाल.

नर्गिस फुल शेतीसाठी आवश्यक जमीन – Flower cultivation

नर्गिस फुलांची लागवड ही सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाते व या फुलांसाठी वालुकामय व चिकन माती युक्त जमीन अधिक फायदेशीर ठरते. चांगला पाण्याचा निचरा होणारी जमिनीचा पीएच 6.5 ते 7.5 च्या दरम्यान आहे अशी जमीन उत्पादन वाढीसाठी मदत करते. नर्गिस फुलांची लागवड केल्यानंतर लगेच खूपच जास्त पाणी शेतकऱ्यांनी देऊ नये.

आवश्यक खतांचा डोस व तापमान

नर्गिस फुलांच्या चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी दहा टन शेणखत प्रति एकर व वर खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश चा उपयोग करावा. 11 ते 17 अंश सेल्सिअस तापमान जर लागवडीच्या वेळेस असेल तर त्याचा फुलांना फायदा होतो.

नर्गिसच्या फुलांचे आयुष्यमान कसे वाढवायचे

फुल शेतीमध्ये प्रामुख्याने येणारी समस्या म्हणजे फुलांचे आयुष्यमान कमी असते व नर्गिसच्या फुलांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी आपण कापलेली नर्गिसची फुले पाण्याच्या बादलीमध्ये ठेवावी जेव्हा दुसरा बहार चालू असेल तेव्हा नर्गिसच्या फुलांची कापणी करावी. नर्गिस फुलांचे सामान्य आयुष्यमान हे सात ते आठ दिवस असते परंतु फुलांचे अधिक आयुष्यमान वाढवण्यासाठी आपण विविध केमिकलचा उपयोग करू शकतो.

शेतकऱ्यांना कसा फायदा होईल

नर्गिसच्या फुलांना मार्केटमध्ये चांगली मागणी असते तसेच नर्गिसच्या फुलांचे कंद विक्री करून देखील आपण नफा कमवू शकतो नर्गिसच्या फुलांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन केले जातात त्यामुळे विविध सीजनमध्ये नर्गिसच्या फुलांना मागणी असते. नर्गिस फुल उत्पादनामध्ये प्रती हेक्टर सरासरी चार लाख फुलांचे उत्पादन मिळू शकते.

जर तुमच्या मनामध्ये नर्गिस फुल शेती विषयी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व जर हा लेख आवडला असेल तर हा लेख शेअर करा व आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

हे पण वाचा

वेबसाईट कशी तयार करायची? How To Create Website in Marathi

वेबसाईटचे डोमेन नेम म्हणजे काय असते

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

IMD update: पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा आलाय अंदाज

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा