MMLBY Big Update: तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींना नाही मिळणार पुढील हप्ता

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत आणि त्यामध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय योजना आहे की 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येतात म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ सदर महिलांना दिला जातो. जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना देण्यात येत आहेत परंतु आता याच योजनेमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 26 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे म्हणजेच त्यांना पुढील लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत.

सदर लाडक्या बहिणींना पुढील हप्ते का मिळणार नाहीत, त्यामध्ये कोणते कारण आहेत. तसेच या योजनेमध्ये कोणकोणते नवीन बदल होत आहेत याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

MMLBY Big Update, 26 लाख महिलांचा लाभ बंद

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत सुरुवातीपासून सांगण्यात आले आहे की ज्या पात्र महिला असतील आणि ज्या महिलांना गरज आहे अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा उद्देश आहे आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनाने विविध विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती तसेच इतर अपडेट मागितले होते.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सदर अपडेट प्राप्त झाल्यानंतर राज्यातील लाखो सरकारी नोकरीमध्ये असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले आहेत तसेच ज्या महिला अपात्रता निकषात बसतात अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेचे पात्रता तसेच पात्रता निकष कोणकोणते आहेत याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजना पात्रता निकष

  1. सदर महिला हे महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी
  2. महिलेचे बँकेमध्ये स्वतःचे बँक अकाउंट असावे आणि ते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे
  3. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे
  4. या योजनेसाठी फक्त विधवा, विवाहित, निराधार, घटस्फोटीत, तसेच परित्यक्ता महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकेल
  5. महिलेचे वय 21 ते 65 वर्षे वयोगटात असावे

लाडकी बहीण योजना अपात्रता निकष

लाडकी बहीण योजनेमध्ये जसे पात्रता निकष आहेत त्याप्रमाणेच अपात्रता निकष पण आहेत आणि यामुळे जर तुम्ही अपात्रता निकषात बसत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा लाभ बंद करण्यात येईल

  1. ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमित स्वरूपात कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत
  2. जर कुटुंबातील सदस्य कंत्राटी पद्धतीने नोकरीस असेल आणि उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर अशा कुटुंबातील व्यक्तींना लाभ प्राप्त होईल
  3. जर महिलेला शासनाच्या इतर योजनांमधून दीड हजार पेक्षा जास्त रुपयांचा लाभ मिळत असेल
  4. ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतो
  5. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार असेल
  6. ज्या कुटुंबातील सदस्य भारत शासन किंवा राज्य शासनाच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल
  7. ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे. (ट्रॅक्टर वगळता इतर)

लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले होते परंतु नंतर लाडकी बहीण योजनेचे गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य शासनाने या योजनेमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील अशी सुविधा सुरू केली होती त्यामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज भरण्यात येत होते.

परंतु 8 ऑक्टोबर 2024 च्या अधिकृत शासन निर्णयानुसार राज्य शासनाने फक्त अंगणवाडी सेविकांनाच लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरता येतील अशी तरतूद नमूद केले आहेत त्यामुळे नवीन अर्ज भरण्याकरिता अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज सादर करावा लागतो.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अद्याप नवीन अर्ज भरण्याची प्रणाली सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे नवीन शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज सादर करू शकतील.


शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा