सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये सर्वत्र तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे आणि त्याचाच वापर करून शासनाच्या वतीने ई चलन पद्धती सुरू करण्यात आलेली आहे. ई चलन पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात फाईन घेतला जातो तसेच बरेच वेळेस आपल्या गाडीवरती किती फाईन बसलेला आहे हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कधी कधी कळत नकळत आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असते आणि त्यामुळे आपल्या गाडीवरती फाईन बसलेला असतो परंतु आपल्याला ते माहीत नसते त्यामुळे आपल्या गाडीवरती किती वाहतूक चलन पेंडिंग आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
शासनाच्या वतीने प्रत्येक नागरिकांना त्यांच्या गाडीवरती किती चलन पेंडिंग आहे हे जाणून घेण्याकरिता एक अधिकृत शासकीय पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. ज्याचा उपयोग करून नागरिक घरबसल्या आपल्या गाडीवरील प्रलंबित असलेले चलन चेक करू शकतील.
घरबसल्या गाडीचे ट्राफिक चलन कसे तपासायचे
नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर जर तुम्ही अजूनही ‘कुणी पाहिलं नाही’ म्हणून सिग्नल तोडत असाल, तर सावध व्हा! कारण आता ई-चलनचा जाळं इतकं मजबूत झालंय की, तुम्ही पळून गेलात तरी तुमच्यावर दंडाची नोटीस घरपोच येणारच!
नवीन नियमानुसार वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे आणि त्यामध्ये जे नागरिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांना फाईन बसत आहे. राज्यात ठिकठिकणी स्पीड कॅमेरे तसेच विविध प्रणालीचा वापर करून वाहतूक नियमन करण्यात येत आहे.
ई चलन – काय आहे नवा फरक?
पूर्वी एखाद्या वाहतूक नियमाचा भंग केला तर फक्त ₹100-₹500 चा दंड होता. पण नव्या कायद्यानुसार दंडाची रक्कम दुप्पट-चौपट नाही, थेट दहापट झाली आहे. त्यामुळे अनेक चालक चांगलेच सावध झालेत. आणि त्यात भर म्हणून ई-चलन सिस्टीमने तर सगळ्यांना सतर्क केलंय.
ई-चलन म्हणजे काय?
ई-चलन म्हणजे तुम्ही ट्रॅफिक नियम मोडला की लगेच ऑटोमॅटिक तुमच्या नावावर ऑनलाइन दंडाची नोंद होते. कधी सिग्नल तोडल्यावर कॅमेरा फोटो घेतो, तर कधी हेल्मेट न वापरल्यामुळे तुमच्यावर दंड लागतो. तुम्हाला SMS किंवा ई-मेलने चलनाची माहिती मिळते.
पण जर तुम्हाला मेसेज येत नसेल, तर घाबरू नका – त्यावर देखील उपाय आहे!
दंड आहे का? घरबसल्या तपासा!
तुमच्या नावावर किंवा गाडीवर काही ई-चलन प्रलंबित आहे का, हे तुम्ही फक्त दोन मिनिटांत तपासू शकता:
➡️ जा या अधिकृत वेबसाईटवर:
👉 https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan
येथे तुम्हाला दोन नंबरचा विकल्प म्हणजेच vehicle number सिलेक्ट करायचा आहे आणि तिथे आपल्या गाडीचा नंबर टाकून तसेच कॅपच्या भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
तिथं तुम्ही तुमचं वाहन क्रमांक (Vehicle Number) टाकून चलनाची माहिती मिळवू शकता. हे एकदम सोपं आहे.
मोबाइल नंबर अपडेट नाही? मग कसे चेक कराल!
बरेच वेळा गाडी खरेदी करताना आपला मोबाइल नंबर RTO मध्ये नोंदवला जात नाही, किंवा तो जुना असतो. त्यामुळे ई-चलनचा मेसेज येत नाही.
➡️ उपाय: तुमचा नंबर अपडेट करा
सोपं आहे – RTO ऑफिसात जायची गरज नाही!
✅ फक्त या लिंकवर क्लिक करा 👉
https://parivahan.gov.in/parivahan
इथं जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा.
धक्कादायक गोष्ट काय?
काहीजणांनी फक्त कुतूहल म्हणून वेबसाईटवर जाऊन तपासलं आणि 10,000 पेक्षा जास्त दंडाचा आकडा बघून थक्क झाले. अनेकदा चालतंय असं समजून नियम मोडले जातात, पण आता डिजिटल सिस्टीममध्ये काहीच लपून राहत नाही.
लास्ट टिप: नियम पाळा, पैशांची बचत करा
- हेल्मेट लावा
- सीट बेल्ट वापरा
- सिग्नल तोडू नका
- ओव्हरस्पीडिंग करू नका
- मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका
नियम पाळाल तर दंडच नाही, आणि टेन्शनही नाही!
शेवटी एवढंच – वेळोवेळी ई-चलन तपासा, नंबर अपडेट ठेवा आणि ट्रॅफिक नियमांचं काटेकोर पालन करा.
नाहीतर एक दिवस अचानक तुमच्या मोबाईलवर येईल – “आपल्या वाहनावर ₹10,000 दंड बाकी आहे!”
ही माहिती इतर वाहनचालक मित्रांना शेअर करा – त्यांच्या पैशाचं आणि वेळेचं वाचणं होईल!