Rain forecast : मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, कोणत्या ठिकाणी दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे याविषयी आजच्या या लेखात माहिती जाणून घेऊयात. छोटीसी अपडेट आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
Rain forecast: आजचा हवामान अंदाज
नागपूर विभागामध्ये आज सकाळपासूनच खूप जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच यवतमाळ, कारंजा, पुसद, हिंगोली, आदिलाबाद या भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दुपारी आणि दुपारनंतर हा पाऊस पश्चिमेकडे सरकत येणार आहे.
अमरावती विभागातील बुलढाणा, चिखली, वाशिम, लोणार तसेच हिंगोली या भागांमध्ये दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे तसेच हे वातावरण दुपारनंतर श्री छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच धुळे, मालेगाव आणि जळगाव या भागांमध्ये बघायला मिळेल. जालन्याचा उत्तरी परिसर सिल्लोड, खामगाव, बुलढाणा या भागांमध्ये देखील आज चांगला जोरदार पाऊस बघायला मिळेल. मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर, धाराशिव या भागांमध्ये दक्षिण भागात पावसाचा जोर काहीसा कमी राहील.
आज ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच माजलगाव, परभणी, बीड या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील. अहमदनगरच्या पूर्वी परिसरामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढताना बघायला मिळू शकतो.
संध्याकाळपर्यंत नाशिक आणि आसपासच्या भागांमध्ये चांगला पाऊस होताना बघायला मिळेल. ज्यामध्ये पूर्वी भागांमध्ये कोपरगाव, निफाड, येवला, वैजापूर या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल तसेच सिन्नर मध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये मध्यरात्रीपर्यंत पावसाचे वातावरण आहे.
पुणे विभागामध्ये कोकणालगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. आज पुणे विभागात पावसाचा जोर इतर ठिकाणी काहीसा कमी राहील.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा