Land Purchase : जमीन खरेदी करत असताना कोणत्या बाबी तपासाव्यात? खरेदीखत करताना या गोष्टींची काळजी घ्याच

Land Purchase: मागील काही वर्षांमध्ये जमिनीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जमिनी खरेदी करून त्यानंतर विक्री करणे हा बऱ्याच लोकांचा व्यवसाय झाला आहे व जमिनीमध्ये गुंतवलेले पैसे एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेतजमीन खरेदी करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी.

शेत जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे फसवणुकीचा प्रकार देखील वाढलेला आहे व कधीकधी आपण जमीन खरेदी करत असताना कायदेशीर बाबी चांगल्या प्रकारे तपासल्या नाही तर आपली देखील फसवणूक होऊ शकते.

जमीन खरेदी करत असताना कोणत्या बाबी तपासाव्यात

जमीन खरेदी करत असताना सर्वात प्रथम संबंधित जमिनीचा सातबारा तपासला पाहिजे.

ज्या व्यक्तीकडून आपण जमीन खरेदी करणार आहोत त्याची मालकी आपण सातबारावर तपासली पाहिजे तसेच इतर हक्कांमध्ये काही नोंदी आहेत का याची माहिती घेतली पाहिजे

जमीन स्वतः आपण जागेवर जाऊन बघितले पाहिजे.

संबंधित जमीन बांध-बंधिस्त आहे का हे तपासले पाहिजे जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता आहे का हे पण चेक केले पाहिजे

जर जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता असेल तर त्याची नोंद इतर हक्कात आहे हे बघा

जमिनीला इतर हक्कदार आहेत का तसेच जमिनीचे वाटप व्यवस्थित झाले आहे का हे चेक करा

संबंधित जमिनीच्या गटाचा नीट फाळणीवारा झाला आहे का हे पण बघा

जर आपण स्वतः जाऊन जमीन बघितले नाही तर कधी कधी आपल्याला कोर्टाचे हेलपाटे मारावे लागू शकतात कारण कधी कधी इतर हक्कांमध्ये रस्ता दाखवला जातो परंतु प्रत्यक्षात तिथे रस्ता अस्तित्वात नसतो तसेच कधी कधी संबंधित जमिनीवर बहिणींचे किंवा इतर नातेवाईकांची नावे लागलेले असतात त्यामुळे आपल्याला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

जर संबंधित जमिनीवर विहीर असेल तर त्या विहिरीवर कोणाचा हक्क आहे हे पण चेक करा.

जमीन खरेदी करताना पुढील गोष्टी टाळा

जमीन खरेदी करत असताना कधी कधी आपण खरेदीखत करण्याची घाई करतो त्यामुळे आपण संबंधित जमीन जागेवर जाऊन बघत नाही किंवा संबंधित जमिनीमध्ये कायदेशीर गुंतागुंत झालेले असते जशी आपण चौकशी करत नाही. जमीन खरेदी करत असताना कधी कधी आपण घाई करतो व लवकर खरेदीखत करून गुंतून बसतो व त्यामुळे पुढे आपल्याला अधिक अडचणींचा सामना करावा लागतो.

जमीन खरेदी करत असताना जमिनीच्या चतूर्सिमा घेतलेल्या आहेत का व संबंधित जमिनीचा विक्रेता त्याच पद्धतीने आपल्याला जमीन विकत आहे का हे बघा. या बेसिक गोष्टी जर आपण पाहिल्या व महसूल ऑफिस मधून जर सातबारे नीट चेक केले व जमिनीची नीट चौकशी केली तर फसवणुकीचे प्रमाण कमी होऊ शकते.

महत्वाची नोंद: जमीन खरेदी करत असताना घाई करू नका व सर्व कायदेशीर बाबी स्वतः नीट तपासून बघा या लेखांमध्ये दिलेली माहिती विविध स्त्रोत मार्फत घेण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार करताना कायदे तज्ञांची आवश्यक मदत घ्या व संबंधित माहितीची स्वतः पडताळणी करा.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा