IMD update: महाराष्ट्र राज्य मध्ये जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला होता परंतु या पावसाची तूट जुलै महिन्याने भरून काढली व जुलै महिन्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस बघायला मिळाला. परंतु पुढील ऑगस्ट महिना शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा महिना ठरू शकतो अशी माहिती हवामान विभागामार्फत प्राप्त झाली आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागामार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 94 ते 99 टक्के पाऊस पडू शकतो.
IMD update | ऑगस्ट महिना ठरणार शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा
खरीप पिकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा पाऊस मानला जातो परंतु आता ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश या भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडणार आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस देखील पडू शकतो.
जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भाचा काही भाग आणि पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत इतर भागांपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो परंतु उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर बहुतांश ठिकाणी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यावर्षी महाराष्ट्र मध्ये दरवर्षीच्या तुलनेत उशिरा पावसाने हजेरी लावली त्यामुळे जून महिन्यामध्ये फक्त 54% पाऊस पडला होता व मराठवाड्यामध्ये फक्त 31 टक्के पाऊस पडला होता परंतु जून महिन्याची कसर जुलै महिन्याने पूर्ण केली व काही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.
दररोज चा हवामान अंदाज whatsapp च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा