IMD update: महाराष्ट्र राज्यात कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट, ठीक ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा संपूर्ण हवामान विभागाचा अंदाज

­IMD update: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काही ठिकाणी खूपच जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसामुळे तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले तसेच पानवठे दुधडी भरून वाहत आहेत काही काही ठिकाणी तर पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे.

सध्या ठाणे आणि मुंबई नगर येथे चांगला जोरदार पाऊस चालू आहे तसेच कोकण विभागामधील काही जिल्हे व विदर्भामध्ये देखील चांगल्या दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. सध्या प्राप्त झालेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही महाराष्ट्र राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चला जाणूया काय आहे हवामान अंदाज.

IMD update | महाराष्ट्र राज्यात आज या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

हवामान विभाग कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे व यामुळे वायव्य दिशेला हा कमी दाबाचा पट्टा पावसाला प्रभाव पडणार आहे त्यामुळेच पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

आज मुंबई महानगरला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसासाठी असलेला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे व याच पार्श्वभूमीवर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व शासकीय व खाजगी प्राथमिक शाळांना व महाविद्यालयांना आज गुरुवार दिनांक 27 जुलै 2013 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई सह कोकण विभागांमध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसासाठीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे जिल्ह्यात देखील रेड अलर्ट देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर विदर्भामध्ये आज पावसासाठीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे याचबरोबर मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांना व उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईमध्ये आज शाळांना सुट्टी अति मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईमध्ये आज असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या तसेच सर्व खाजगी प्राथमिक शासकीय माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यांनी मुंबईकरांना विनंती केली आहे की कृपया सर्वांनी सतर्क राहावे व गरज असल्यास तरच बाहेर पडावे व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तसेच चंद्रपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आले आहे.

रत्नागिरी मध्ये देखील शाळांना सुट्टी जाहीर; रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच जोडपले आहे व त्याचा परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे रात्री अकरा वाजता प्राप्त झालेल्या शासकीय अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे तसेच काजळी नदी, शास्त्री, बाव नदी व कोदवली नदी या नद्या धोक्याच्या इशाऱ्या पातळीवरून वाहत आहेत. आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

व्हाट्सअप वर दररोजचा मोफत हवामान अंदाज प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा

Havaman andaj

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा