Gold Scheme: भारतामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते व त्या दिवशी सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते परंतु मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये डिजिटल सोन्याचे चलन आलेले आहे व हे डिजिटल सोने भौतिक सोन्यापेक्षा जास्त देखील असते.
भारत सरकारच्या Sovereign Gold Bond या डिजिटल सोन्याच्या बाँड मध्ये तुम्ही गुंतवणूक करून सोने खरेदी करून त्यावरती व्याज देखील मिळवू शकता. एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) किंवा सार्वभौम सोन्याचा बाँड यांच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता.
केंद्र सरकारच्या माध्यमातून 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड ची सुरुवात करण्यात आलेली होती आणि या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिक एक ग्रॅम सोन्यापासून ते चार किलोग्रॅम सोनेपर्यंत डिजिटल सोने खरेदी करू शकता व त्यावरती चांगला परतावा मिळवू शकतात. संबंधित सोन्याची रक्कम ही रिझर्व बँकेच्या माध्यमातून निर्धारित केले जाते.
सध्या डिजिटल पेमेंट बँक च्या माध्यमातून डिजिटल सोने खरेदी केले तर त्यावरती संबंधित कंपन्यांकडून चांगली ऑफर देखील देण्यात येत आहे. सार्वभौम सोन्याचा बॉण्ड आपण बँक, पोस्ट ऑफिस तसेच NSE आणि BSE च्या माध्यमातून खरेदी करू शकतो. एकदा आपण जर सार्वभौम सोन्याचा बॉण्ड घेतला तर कमीत कमी पाच वर्षे आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक ठेवावी लागते.
जेव्हा आपण भौतिक स्वरूपात असतो आणि खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्याच्या शुद्धतेची खात्री करून घ्यावी लागते परंतु डिजिटल सोन्यामध्ये आपल्याला पावती मिळत असते व सोन्याच्या बाबत काळजी करण्याची चिंता नसते.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा