Havaman Andaj: महाराष्ट्र मध्ये अकरा तारखे नंतर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागराजवळ तमिळनाडूच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामान वर होऊन पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रात उत्तर दिशेकडे सरकणार आहे. दहा तारखेच्या संध्याकाळी किंवा मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि काही ठिकाणी थोडा तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसा संदर्भात ही एक छोटीशी अपडेट आहे जी संपूर्ण वाचा आणि महाराष्ट्रात कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे हे जाणून घ्या.
Havaman Andaj: जोरदार पावसाचा हवामान अंदाज
दहा तारखेच्या संध्याकाळी त्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागांपर्यंत पाऊस पोहोचणार आहे. दहा तारखेची मध्यरात्र ते अकरा तारखेपर्यंत नागपूर विभागाच्या पूर्वी भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. देसाईगंज, मुरमगाव, अर्मोरी या भागांमध्ये अकरा तारखेच्या पहाट पासून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
अकरा तारखेच्या दुपारपर्यंत हेच वातावरण थोडे आजूबाजूला बघायला मिळेल नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. गोंदिया आणि भंडाराच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अकरा तारखेच्या दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळेल. तसेच नागपूर विभागाच्या पूर्वी पट्ट्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल.
अकरा तारखेच्या संध्याकाळी ते मध्यरात्री पर्यंत चिमूर, चंद्रपूर, सिंदेवाही आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये 11 तारखेला संध्याकाळी यवतमाळ तसेच कारंजा च्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे.
अकरा तारखेला मुख्यतः नागपूर विभाग आणि अमरावती विभागाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात इतर भागांमध्ये देखील वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल.
हे पण नक्की वाचा: IMD Alert: पंजाब डख यांचा फेब्रुवारी महिन्याचा लेटेस्ट अंदाज, या जिल्ह्यात गारपीट