समुद्रातील आगीला काय म्हणतात, समुद्रातील आग विषयी संपूर्ण माहिती

समुद्रामध्ये आग लागण्याची प्रणाली एक दुर्मिळ प्रणाली असते. समुद्रामधील आगीला आपण मराठी भाषेमध्ये बड़वानल असे म्हणतो. समुद्रामध्ये आग लागण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक तेलाचा प्रभाव किंवा गॅसचा प्रभाव यामुळे समुद्रात आग लागू शकते.

समुद्रातील आगीला वेगवेगळी घटक कारणीभूत असू शकतात. समुद्रामध्ये लागणारी ही आग समुद्र भागाच्या पृष्ठभागावर किंवा समुद्राच्या इतर खालील भागांमध्ये लागू शकते. पाणी हा साधारणता आगेच्या विरुद्ध काम करणारा घटक आहे परंतु काही रासायनिक प्रक्रियांमध्ये पाण्यामध्ये आग लागण्याची प्रणाली सिद्ध झाले आहे

समुद्रातील आगेची कारणे

तेलामुळे देखील समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर ती आग लागण्याची शक्यता असते ज्यामध्ये जेव्हा समुद्रामध्ये बाह्य स्त्रोतामधून तेल मोठ्या प्रमाणात पडते तेव्हा पाण्यावरती तेलाचा तवंग निर्माण होतो जो सूर्यप्रकाश शोषून घेतो आणि त्यामुळे संबंधित भाग हा अत्यंत गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते.

तेलाप्रमाणेच जेव्हा गॅस हा समुद्रामध्ये मिक्स होतो तेव्हा गॅसचा स्फोट होऊन समुद्रामध्ये आग लागण्याची शक्यता असते परंतु अशा घटना या फारच दुर्मिळ असतात.

जेव्हा समुद्राच्या आत मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा देखील आपल्याला काही सहज समुद्रावरती आग लागल्यासारखे चित्र बघायला मिळते परंतु समुद्राच्या पाण्यामुळे लावा लवकरच थंड होऊन तिथे खडकांचे डोंगर बघायला मिळतात.

समुद्रातील आगीचे प्रकार

समुद्रामधील आगेचे आग लागण्याच्या ठिकाणावरून मुख्यतः दोन प्रकार पडतात त्यामध्ये समुद्राच्या पाण्यावरील आगीला आपण पृष्ठभागावरील आग असे म्हणू शकतो जी आग सहसा तेलामुळे किंवा रासायनिक पदार्थांचा लेयर पाण्यावरती निर्माण झाल्यामुळे लागते.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तसेच विविध गॅसच्या संबंधांमुळे समुद्राच्या पाण्याखाली पृष्ठभागावर देखील आग लागण्याची शक्यता असते ज्याला आपण समुद्राच्या पाण्याखाली आग म्हणू शकतो.

समुद्रामधील आग कशी कशी विझवावी

जर समुद्र वरील आग ही मोठ्या प्रमाणात लागलेले असेल तर संबंधित आग विझवणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते व यासाठी विविध गोष्टींची मदत घ्यावी लागू शकते.

जेव्हा तेलामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरती आग लागते तेव्हा त्यावरती पाण्याचा शिडकावा करून तेलाचे प्रमाण समुद्राच्या पाण्यावरती कमी करावे लागते.

विविध देशांमध्ये अग्निशामक दलाच्या मदतीने देखील जर समुद्रावरती मोठ्या प्रमाणात आग लागलेली असेल तर ती विझवण्याचे कार्य केले जाते याचप्रमाणे अग्निशामक विमानांचा देखील संबंधित कार्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

समुद्रातील आग वेळीच भिजवणे गरजेचे असते कारण जर समुद्रामध्ये आगीचे प्रमाण वाढले तर पाण्याचे तापमान वाढून समुद्रातील जीवांना धोका निर्माण होऊ शकतो तसेच याचा संबंधित मानवी आरोग्यावरती देखील वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच जरी समुद्रामध्ये आग लागण्याचे प्रमाण हे दुर्मिळ असले तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

समुद्रातील आग टाळण्यासाठी उपाय

समुद्रातील आग टाळण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो आपण समुद्रामधील सांडलेल्या तेलाचा व गॅस चा निचरा चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी प्रयत्न करू शकतो तसेच समुद्रातील ज्वालामुखी प्रक्रिया वरती आग विझवण्याची यंत्रणा तयार ठेवून आपण संबंधित घटनेमध्ये देखील प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो एकंदरीत सांगायचे झाले तर समुद्रातील आग टाळण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाययोजना आणि जनजागृती करू शकतो.

हे पण बघा:

काम सोडण्याचा अर्ज, सोप्या आणि प्रोफेशनल भाषेमध्ये

सारांश

आजच्या या लेखांमध्ये आपण समुद्रातील आगीला काय म्हणतात तसेच समुद्रातील आगे विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली जर तुम्हाला आजच्या या लेखात कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता समुद्रामधील आग ही पूर्णपणे न टाळता येणारी नैसर्गिक घटना आहे परंतु आपण याविषयी जनजागृती करून समुद्रामधील आगीला काही प्रमाणात आळा घालू शकतो व त्यापासून होणाऱ्या नुकसान पासून आपले रक्षण करू शकतो.

हे पण बघा:

1. लाक्षणिक उपोषण म्हणजे काय

2. कलम 324 माहिती मराठी

3. गुंतवणूक करण्याआधी बघा पोस्ट ऑफिस, RD आणि PPF मध्ये मिळतेय इतके व्याज


शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा