कपाशीवरील पाते गळतीवर रामबाण उपाय, एका झटक्यात नियंत्रण, मिटणार कपाशी उत्पादकांच्या डोक्याची कटकट

Cotton management: सध्या महाराष्ट्रातील कापूस शेतकरी हे मोठ्या प्रमाणात पातेगळतीच्या समस्येला सामोरे जात आहेत कपाशीवरील पातेगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणूनच याच्यावरती वेळीच उपाय करणे गरजेचे ठरते. कपाशीवरील पातेगळती साठी वेगवेगळे घटक कार्य करत असतात.

बदलते हवामान, वाढत असलेले तापमान तसेच जमिनीतील ओलावा कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पातेगळतीला सामोरे जावे लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील कपाशी बोंडे लागण्याच्या स्थितीत आहे व अशा परिस्थितीत पाते गळती झाली तर नुकसानीचा धोका आणखीन वाढतो.

Cotton management – पाते गळती वर उपाय

कपाशी मधील पातेगळ रोखण्यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने महत्त्वाची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये ते नैसर्गिक पातेगळ रोखण्यासाठी नेपथलीन ऍसिटिक ऍसिड हे 2.5 मिली लिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारण्याचा सल्ला देतात.

कपाशीच्या पिकाला चांगल्या नत्राची आवश्यकता असते व त्यामुळे बागायती पिकासाठी 52 किलो युरिया प्रती एकर या प्रमाणात व कोरडवाहू जमिनीसाठी 31 किलो युरिया प्रति एकर देण्यात यावा. कपाशी मधून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी 200 ग्रेडचे डीएपी 2% व त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून प्रतिदहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.

हे पण वाचा: पिक विम्याची फाईल रखडली इतक्या कोटींची गरज

जर आपल्या कपाशीमध्ये लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळत असेल तर आपण वीस ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट हे 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फुल लागण्याआधी ते बोंडे लागण्याच्या कालावधीमध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.

कपाशी तसेच अशाच अन्य पिकांच्या नावीन्यपूर्ण माहितीसाठी शेतकरी ग्रुप जॉईन करा.

हे पण वाचा: जोरदार पावसाचा इशारा, पुढील ४ दिवसांचा हवामान विभागाचा हवामान अंदाज जाहीर

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment