Havaman andaj: झारखंड जवळ निर्माण झालेल्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसासाठी सक्रिय वातावरण बघायला मिळत आहे त्यामुळेच महाराष्ट्र मध्ये गणपती बसल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे व पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या भारतामध्ये सिक्कीम पासून ते विदर्भ मराठवाड्यापर्यंत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुढील 48 तासांमध्ये संबंधित भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मध्ये काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती परंतु हा आठवडा पावसाचा असणार आहे.
या ठिकाणी पाऊस havaman andaj
महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि रायगड या परिसरामध्ये पुढील दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. संबंधित भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व उर्वरित महाराष्ट्रामध्ये ठीकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 26 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा आहे.
Maharashtra drought: राज्यात दुष्काळाची चाहूल, १३ जिल्हे रेड झोन मध्ये! पुढे काय होणार
महाराष्ट्र मध्ये 24 ते 26 तारखेच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुढील चार दिवसात काय होते हे बघणे महत्त्वाचे ठरते.
Maharashtra Rain Update: पुढील 3 दिवस कुठे पडणार जोरदार पाऊस? हवामान विभाग अंदाज
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा