IMD update: अरे वा! पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

IMD update: महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगला जोरदार धरला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी चांगला पाऊस पडताना बघायला मिळत आहे जवळपास एक महिन्यांच्या अंतरानंतर महाराष्ट्रात पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अशातच हवामान विभागाकडून नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आलेला आहे यामध्ये पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कुठे पाऊस पडू शकतो याचा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 25 जुलैपासून 5 सप्टेंबर पर्यंत प्रदीर्घ पावसाचा खंड पडला होता त्यामुळे कोरडा दुष्काळ लागू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली होती परंतु सहा सप्टेंबर रोजी ठीक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली व त्यानंतर पिकांना नव संजीवनी मिळाली.

IMD update: या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मागील तीन चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत असला तरी मधल्या कालावधीमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे व त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ठाणे पालघर तसेच मुंबईमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे.

मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार पाऊस पडताना बघायला मिळत आहे गोदावरी नदीला पूर आला आहे व नदी नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे गोकुळाष्टमी पासून मुंबई आणि कोकणालगतच्या भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली त्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे.

पुणे, सातारा यांच्या घाटमाथ्यावर आणि कोकणालगतच्या परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच कोकण विभाग, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची सरी बरसण्याची शक्यता आहे.

दररोज चा हवामान अंदाज मोफत व्हाट्सअप माध्यमातून मिळवण्यासाठी आताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment