India Meteorological Department: सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाचा परत ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे सप्टेंबर च्या सुरुवातीला पावसाने सर्वदूर हजेरी लावली मात्र आता परत पावसाचा खंड पडला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता व आता सप्टेंबर महिन्यामधील पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता व शेती कामांना वेग आला होता.
सप्टेंबर महिन्यामधील पहिल्या आठवड्यात होत असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला होता परंतु आता आज पासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस विश्रांती घेणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची काहीशी चिंता वाढणार आहे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये आत्तापर्यंत रिमझिम पाऊस झाला परंतु पिण्याचा पाण्याचा प्रश्न वाढला आहे.
हवामान खात्याने सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर मध्ये मराठवाडा सोडला तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी झाली होती आणि शेती कामांना वेग आला होता.
IMD update; पावसाची माहिती
संपूर्ण पावसाच्या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून नवीन हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे यामध्ये पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. हा हवामान अंदाज निश्चितच शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

महाराष्ट्र राज्य मध्ये आज सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आज कोणत्याही जिल्ह्याचा देण्यात आलेला नाही पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेईल व त्यामुळे उष्णता जाणवण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेले आहे.
दररोज चा हवामान अंदाज मोफत व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी उजव्या साईडला असलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करून आत्ताच आम्हाला जॉईन करा व हवामान अंदाज सोबत विविध नाविन्यपूर्ण माहिती मिळवा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा