Pik Vima: महाराष्ट्र मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली व सप्टेंबर महिन्यामध्ये पण काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला नाही त्याच पार्श्वभूमीवर 18 जिल्ह्यांमध्ये अधिसूचना निघाली होती त्यामध्ये पीक विम्याची 25 टक्के रक्कम आगाऊ देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु याच्यामध्ये पण आता विघ्न आले आहे.
राज्य सरकारने संबंधित अधिसूचनेसाठी पिक विमा कंपन्यांना दीड हजार कोटी रुपये देणे बाध्य होते परंतु आतापर्यंत राज्य सरकारने विमा कंपन्यांना 500 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे उर्वरित 1000 कोटी रुपयांसाठी पिक विम्याची फाईल काहीशी रखडलेली बघायला मिळत आहे.
सध्या महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे व त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे म्हणूनच केंद्र सरकारच्या नियमानुसार 25% पीक विम्याची रक्कम आगाऊ देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही.
पिक विम्याची 18 जिल्ह्यात अधिसूचना करण्यात आली होती सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली होती परंतु यासाठी 1551 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांना द्यायचा होता त्यापैकी राज्य सरकारने आतापर्यंत पाचशे कोटी रुपयांचा हप्ता दिलेला आहे म्हणूनच एक महिना उलटून गेला तरीही शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम देण्यात आलेली नाही.
वेगळ्या जिल्ह्यात वेगळे निकष असण्याची शक्यता Pik Vima
१. सध्या महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड आहे परंतु आत्तापर्यंत अठरा जिल्ह्यांना अधिसूचना निघालेली आहे व सोलापूर, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अजूनही अधिसूचना निघालेली नाही.
२. संबंधित जिल्ह्यांमध्ये पिकांसाठी पीक विम्याचे निकष बदलण्याची शक्यता आहे
३. जेव्हा पीक कापणी करायचे असते त्याच्या आधी पंधरा दिवस अधिसूचना निघत नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागू शकते.
हे पण वाचा : साखरेचे दर कोसळणार शासन निर्णय जाहीर
सध्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वित्त विभागाकडे संबंधित उरलेली हजार कोटींची रक्कम पिक विमा कंपन्यांना जमा करावी यासाठी फाईल पुढे सरकवलेली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये हा हप्ता पिक विमा कंपन्यांकडे सुपूर्त केला जाऊ शकतो व त्यानंतर 25% पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
अशाच नवनवीन आणि नावीन्यपूर्ण माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे पण बघा: कपाशीवरील पाते गळतीवर रामबाण उपाय
पुढील चार दिवसांचा हवामान विभागाचा सुधारित हवामान अंदाज बघा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा