Punjab Dakh: अमेरिकन हवामान विभागाने यावर्षी मान्सूनपूर्वी एलनिनो चा प्रभाव बघता आशिया खंडातील बहुतांश देशांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा अंदाज वर्तवलेला होता यामध्ये भारतामध्ये देखील काही ठिकाणी दुष्काळ पडेल असे सांगितले होते.
यावर्षी भारतामध्ये दरवर्षीच्या तुलनेमध्ये खूपच उशिरा पावसाने आगमन केले व जून महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये खूपच कमी पाऊस पडला त्यामुळे अमेरिकन हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो की काय अशीच भीती शेतकऱ्यांना वाटत होती.
Punjab Dakh: सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल एवढे दिवस पाऊस नाही
परंतु जुलै महिन्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली या कालावधीमध्ये विदर्भ आणि कोकणामध्ये पावसाचा जोर सर्वात जास्त बघायला मिळाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली होती.
आता ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा 14 दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची कमतरता बघायला मिळत आहे. दरम्यान 20 तारखे नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे परंतु जुलै प्रमाणे हा पाऊस जोरदार असणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील हवामान तज्ञ पंजाब डख यांचा हवामान अंदाज आला आहे यांनी 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान चांगला जोरदार पाऊस होईल असे वर्तवलेले आहे परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा खंड पडण्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
पंजाब डख यांच्या माहितीनुसार एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान खूपच तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणजेच महाराष्ट्रात पावसाचा खंड राहील. परंतु 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
आता पंजाबराव डख दिलेल्या माहितीनुसार 16 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस पडतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये काय होईल याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा