Maharashtra Rain: जुलै महिन्याच्या शेवटला महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार पाऊस चालू होता परंतु ऑगस्ट महिन्यात चालू झाल्यानंतर बऱ्याच भागांमधून पाऊस गायब झालेला बघायला मिळतोय. महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय परंतु जोरदार पावसाची कमतरता अजूनही जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केव्हा जोरदार पावसाच्या आगमन होणार आहे हे आजच्या हवामान अपडेट मध्ये जाणून घेऊया.
भारतीय हवामान खात्याने सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार पुढच्या आठवड्यामध्ये देखील पावसाची परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस पडू शकतो परंतु जोरदार पावसाला 18 ऑगस्ट पर्यंत वेळ लागू शकतो.
Maharashtra Rain: महाराष्ट्रात कधी परत येणार जोरदार पाऊस
महाराष्ट्र राज्यामध्ये 18 ते 24 ऑगस्ट मध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलेले आहे या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भतील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये विश्रांती घेत असलेला पाऊस पुन्हा पडायला सुरुवात होईल.
तसेच 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. संबंधित भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. परंतु मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्याहीपेक्षा कमी पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे.
Monsoon update:
As predicted, classical monsoon break was set in on 6th Aug (red lines). Models suggest weak monsoon may continue for another 10 days or so. Subsequently, a revival is seen but with an uncertainty.
The El Nino is impacting the monsoon. @Indiametdept @moesgoi pic.twitter.com/53N7IRzM8T
— Madhavan Rajeevan (@rajeevan61) August 10, 2023
सध्या 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात चांगला दमदार पाऊस पडणार नाही. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचे प्रमाण 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान अल्पत्य राहील.
जून जुलै महिन्यामध्ये पडलेल्या चांगल्या पावसामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळी तळी तलाव भरलेले आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांच्या जनजीवनावर लांबत चाललेल्या पावसाचा कमी प्रभाव दिसून येत आहे. परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पिके तानावर आले आहे व त्यामुळे खरीप हंगामात पिकांना नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा