IMD alert: सध्या पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे प्रतिपादन हवामान विभागाने केलेले आहे राजस्थान, गुजरात, आणि महाराष्ट्र मध्ये संबंधित वातावरण निर्मिती होताना बघायला मिळत आहे. 25 सप्टेंबर पासून राजस्थान मध्ये नैऋत्य मोसमी वारे परतीच्या प्रवासाला निघण्याची सुरुवात करणार आहेत.
संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारले व आता सप्टेंबर महिन्यामध्ये देखील पाऊस वाट बघायला लावत आहे. काही भागांमध्ये अजूनही चांगला जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील 65 धरणे पडतील की नाही यात शंका आहे. अशातच हवामान विभागाकडून परतीच्या पावसाची तारीख आलेली आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास कसा होतो IMD update
मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी वायव्य भारतामध्ये पावसाने दडी मारणे गरजेचे असते. म्हणजेच वायव्य भारतात पावसाने दडी मारली तर मान्सून चा परतीचा प्रवास सुरू होतो. मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी हवेतील आद्रता कमी होणे गरजेचे असते. तसेच हवेच्या दाबाच्या केंद्राकडून बाहेरच्या बाजूला वारे वाहण्यास सुरुवात झाली तर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
हे बघा: साखरेचे दर कोसळणार, साखर कारखान्यांना तात्काळ साखर विकण्याचे आदेश
सध्या पश्चिम राजस्थान मध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक वातावरण निर्माण होत आहे परंतु अजून मान्सून परतीच्या प्रवासाला लागलेला नाही. मान्सून २५ सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासाला लागण्याची संकेत आहेत.
दररोज च्या हवामान अपडेट साठी आम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन करा
हे पण बघा: पुढील 4 दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस, अलर्ट जारी!
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा