IMD update: बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे परंतु अरबी समुद्र कडून येणाऱ्या वाऱ्यांची गती तीव्र आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातील कोकण तसेच गोवा मध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 72 तासांमध्ये वातावरणाची स्थिती सारखीच राहणार असल्यामुळे पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.
आज कोकण तसेच घाटमाथ्याच्या परिसरावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ठीक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान अंदाज हवामान खात्याच्या मार्फत सांगण्यात आलेला आहे.
IMD update • पावसाचा अंदाज
पुणे हवामान विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस कोकण आणि गोवा प्रदेशांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचबरोबर 21 आणि 22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी बघायला मिळू शकते असा अंदाज देण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पुढील 24 तासांमध्ये हलका मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस काही काही ठिकाणी असू शकतो.
हे पण बघा:
Onion Rate: भविष्यात कांद्याचे बाजार भाव कधी वाढतील?
पुढील तीन-चार दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच विदर्भामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस बघायला मिळू शकतो.
हे पण बघा: टोमॅटोचे बाजार भाव अचानक कसकाय पडले बघा
पुण्यामध्ये आज मुख्यतः हलका पाऊस पडू शकतो या पावसाची सर्वदूर शक्यता नाही च्या बरोबर आहे. पुण्याच्या घाटमाथ्याच्या परिसरावर ठीकठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. मुंबईमध्ये देखील आज गणरायाचे आगमन हे हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींमध्ये होण्याची शक्यता आहे.
दररोज चा हवामान अंदाज मोफत व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी शेतकरी ग्रुप जॉइन करा.