Monsoon Update : पुढील चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज

Monsoon Update : जून महिना चालू होऊन पंधरा दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र मध्ये चांगला पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतीची सर्व कामे खोळंबलेली आहेत. पेरणी करण्यासाठी बळीराजा पावसाची वाट पाहत आहे अशातच हवामान विभागाने एक चांगली बातमी दिलेली आहे की पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल.

महाराष्ट्र राज्यात आणि देशामध्ये वातावरणात सातत्याने मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत काही ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आपल्याला बघायला मिळाली. तर राज्यामध्ये काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुढील चार दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्र राज्यात पुढील चार दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस

पुढील चार दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात मेघगर्जनेसह ठीक ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई मध्ये 22 जून रोजी हलका पाऊस होईल तर 23 आणि 24 जून रोजी मुसळधार पाऊस होईल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर दक्षिण पश्चिम वाऱ्यांचा वेग मंदावल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली.

किनारपट्टीवर कसा असेल पाऊस

केरळ आणि कर्नाटकच्या समुद्र तटावर जास्त प्रमाणात ढग निर्माण होताना बघायला मिळत आहे तसेच अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून सक्रिय होण्याची लक्षणे दिसत असल्याची माहिती हवामान विभागामार्फत देण्यात आले आहे. जर महाराष्ट्रात योग्य परिस्थिती राहिली तर पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कसा असेल पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 दिवसांत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. 23 जून रोजी हलका पाऊस पडेल तर 24 आणि 25 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कोकणामध्ये जोरदार पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पुणे विभागात दोन ते तीन दिवसांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये साधारण पाऊस होऊ शकतो. पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment