Onion Export: कांदा दरात होणार मोठी घसरण, केंद्र सरकारचा निर्णय

Onion Export: जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी व कांद्याचे दर वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांवर डायरेक्ट परिणाम होणार आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा दरात वाढ होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे ३१ डिसेंबर 2023 पर्यंत कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क लागू करणार असल्याची माहिती दिलेली आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा त्यामध्ये 50 ते 60 रुपये दरवाढ होईल असा अहवाल वेगवेगळ्या वित्तीय संस्थाद्वारे देण्यात आलेला होता व त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आधीच कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हदबल झालेले होते व अशातच केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण केलेला आहे. संभाव्य मतपेढी वर लक्ष ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचा काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने यावर बोलताना म्हटले आहे की “केंद्राने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावून कांदा दर पाडण्याचे षडयंत्र केले आहे आम्ही राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केंद्र ला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू.”

दररोज अशाच नवनवीन उपयुक्त शेतीविषयक बातम्या प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा

IMD update

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा