Monsoon update: नमस्कार मित्रांनो आज काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आज पासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात हे अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करू त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
पूर्व किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात मागील तीन-चार दिवसापासून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळाला. त्याचबरोबर कोकण विभागांमध्ये पावसाचा जोर कायम होता. कोकण विभागालगतचा जो काही घाटमाथा परिसर आहे या भागांमध्ये दोन-तीन मुसळधार पाऊस बघायला मिळाला. आजही घाटमाथ्यावर जोरदार पाऊस राहणार आहे.
Monsoon update | आजचा हवामान अंदाज
मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, दुर्ग कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्यम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या मान्सूनची आज उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे जो काही कमी दाब आहे हा उत्तर तसेच पूर्व भागाकडे गेल्यामुळे साहजिकच राज्यात पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी होताना बघायला मिळेल.
तरीपण आजही काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी जोरदार वारी सुटतील. कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुख्यते करून घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात आज पावसाचे वातावरण आहे. पावसाचा जोर आज आपल्याला कमी होताना बघायला मिळत आहे. कमी ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. वाशीम आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो.
नागपूर विभागामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. जो काही कमी दाब उत्तरे कडे तसे दक्षिणेकडे सरकल्यामुळे हे वातावरण देखील आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळत आहे. त्यामध्ये नागपूरच्या पूर्व भागामध्ये, पूर्व विदर्भामध्ये, नागपूर विभागातील पूर्व भागामध्ये गोंदिया भंडारा तसेच गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये, देसाईगंज चौकी, कापसी या भागांमध्ये होणार या परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
आजचा मराठवाडा हवामान अंदाज
मराठवाड्यात आज पावसाचा जोर जरी कमी झाला तरी पण नांदेडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. लातूर, परभणी, बीडमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. हिंगोली मध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आज बघायला मिळेल.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये इतर भागांमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. धाराशिव आणि सोलापूर मध्ये आज पावसाचा जोर कमी राहील.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. काही ठिकाणी हलका त्यामध्ये स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नाशिक विभागापासून ते पुणे सातारा सांगली यांचा मधला जो पूर्वी परिसर आहे त्यामध्ये आज कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा