सध्या महाराष्ट्र मध्ये जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरतीच्या जागांची घोषणा करण्यात आलेली आहे संबंधित भरतीमध्ये जलसंपदा विभागामध्ये 4497 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण जलसंपदा विभाग भरती पात्रता विषयी माहिती जाणून घेऊया.
जलसंपदा विभाग भरतीसाठी तीन नोव्हेंबर 2023 पासून अर्ज मागविण्यात येत आहेत संबंधित अर्ज हे जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर करायचे आहेत. जलसंपदा विभागामधील आरेखक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, लघुलेखक या पदांसाठी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे.
जलसंपदा विभाग भरती पात्रता
1. वय मर्यादा
खुल्या उमेदवारांसाठी: 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीय उमेदवार: 18 ते 43 वर्ष
पदवीधर अंशकालीन: कमाल वय मर्यादा 55 वर्ष
खेळाडू : कमाल वय मर्यादा 43 वर्ष
दिव्यांग तसेच प्रकल्पग्रस्त: कमाल वय मर्यादा 45 वर्ष
माजी सैनिक: कमाल वय मर्यादा 45 वर्ष
2. शैक्षणिक पात्रता
• वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: कृषी, रसायनशास्त्र किंवा भूशास्त्र मधील पदव्युत्तर पदवी किमान 60 टक्के गुणांसह
• निम्न श्रेणी लघुलेखक: माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असावे व टंकलेखन मधील किमान गतीस प्राप्त असावे
• कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र किंवा कृषी मधील पदवी प्राप्त केलेली असावी
• भू वैज्ञानिक सहाय्यक: संबंधित उमेदवारांनी भू शास्त्रामध्ये पदवी प्राप्त केलेली असावी तसेच संबंधित उमेदवाराला अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल
• आरेखक: विद्युत, यांत्रिकी किंवा स्थापत्य मधील अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका तसेच शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील तीन वर्षांचा अनुभव
• सहाय्यक आरेखक: यांत्रिकी, विद्युत किंवा स्थापत्य मधील पदविका शिक्षण
• मोजनिदार: कोणत्याही शाखेमधील पदवी तसेच न्यूनतम टंकलेखनाची गती प्राप्त केली पाहिजे
• कालवा निरीक्षक: कोणत्याही शाखेमधील पदवी तसेच कमीत कमी टंकलेखनाची कृती प्राप्त केलेली असावी व संबंधित सर्टिफिकेट
3. भारतीय नागरिकत्व
जलसंपदा विभागातील भरतीसाठी संबंधित उमेदवाराकडे भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे
4. टंकलेखन पात्रता
विविध पदांसाठी टंकलेखन पात्रता आवश्यक आहे संबंधित टंकलेखन पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे या टंकलेखनाची गती व अन्य पात्रता साठी आपण खाली दिलेली पीडीएफ बघू शकता.
जलसंपदा विभाग भरती पात्रता पीडीएफ
हे पण बघा: जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम
सारांश:
मला आशा आहे आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला जलसंपदा विभाग भरती पात्रते विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा लेख आवडलेला असेल तर हा लेख आत्ताच पुढे शेअर करा व जर तुम्हाला या लेखात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तसेच काही सुधारणा आवश्यक असतील तर कमेंटच्या माध्यमातून कळवा.
हे पण बघा:
जांभूळ खाण्याचे फायदे आणि तोटे
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा